पंढरपूर तालुक्यातील नवीन कोरोना रुग्ण संख्येत घट

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या तीन महिन्यापासून कोरोना केसेस ने हैराण झालेल्या पंढरपूरकराना आज मोठाच दिलासा मिळाला आहे. आजच्या अहवालानुसार शहर आणि तालुक्यात केवळ 28 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हॉटस्पॉट ठरलेल्या ग्रामीण भागात आज केवळ 22 तर शहरात 6 रुग्ण आढळून आले आहेत.

पंढरपूर शहर आणि तालुक्यात गेल्या 3 महिन्यापासून दररोज शेकडो कोरोना रुग्ण आढळून येत होते. एप्रिल, मे,जून महिन्यात तर तालुक्यात बेड्स उपलब्ध होत नव्हते आणि मृत्यूची संख्या ही चिंताजनक होती.

मात्र मागील 8 ते 10 दिवसांपासून तालुक्यातील रुग्ण संख्या कमी होत असून आजच्या अहवालानुसार शहर आणि तालुक्यात केवळ 28 रुग्ण आढळून आले आहेत. आणि एकाच रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. हा अहवाल तालुक्यातील नागरिकांना दिलासा देणारा असून लवकरच तालुक्यातील जनजीवन सुरळीत होण्याची शक्यता बळावली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!