दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात

 अमरावतीत चार रुग्ण, धोका वाढला

टीम : ईगल आय मीडिया

4 पट अधिक वेगाने पसरू शकणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलच्या नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. यवतमाळ आणि अमरावतीमध्ये या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे त्याचा संसर्ग अधिक वेगाने होतो आहे, अशी माहिती कोरोना टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यांतल्या प्रमुख शहरांत तसंच ग्रामीण भागांत देखील कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यात आता ही ठोस माहिती समोर आली आहे.


“हा नवा स्ट्रेन अधिक वेगात फैलावू शकतो. त्यामुळे येत्या काळात शासनाला मिनी कन्टेन्मेट तसंच मायक्रो कन्टेन्मेट झोन करावे लागतील आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. त्याच अनुषंगाने अकोल्यात रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असंही डॉ. शशांक जोशी म्हणाले.

“अमरावतीमध्ये चार रुग्णामध्ये एक E484k म्हणून स्ट्रेन आला आहे. स्पाईक प्रोटीनचा स्ट्रेन आहे. यू.के. आणि ब्राझीलच्या स्ट्रेनशी तो मिळताजुळता आहे. या स्ट्रेनची प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते किंवा तो अधिक वेगाने पसरतो. अमरावतीमधल्या 4 रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे.”


“अकोल रिजनमध्ये या स्ट्रेनचा जास्तीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि यवतमाळमध्ये एक N444 हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अजूनही आपल्या व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटने याबाबतची सविस्तर माहिती दिलेली नाहीय. पण या स्ट्रेनमधून होणारा कोव्हिड आणि नॉर्मल कोव्हिड यामध्ये जास्त फरक नसेल”, असं डॉ. जोशी म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!