पंढरपूर शासकीय विश्राम गृहासाठी २१ कोटी रुपये मंजूर

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी ५८कोटी मंजूर : आ समाधान आवताडे

पंढरपूर : EAGLE EYE NEWS

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांच्या विविध प्रलंबित विकास कामांसाठी चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान ५७कोटी ६८लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

आमदार आवताडे यांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची पूर्तता होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे या निधीसाठी पत्रव्यवहार केला होता.

या मागणीची दखल घेऊन पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची सद्य काळात असणारी इमारत फार जुनी झाली असल्याने याठिकाणी उपविभागीय कार्यालयाच्या दोन इमारती उभारणीसाठी ६कोटी ३७ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

त्याचबरोबर पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह याठिकाणी नवीन विश्रामगृह उभारणीसाठी आवश्यक निधी मिळण्यासाठीही आमदार आवताडे यांनी पाठपुरावा केला होता. हे सुसज्ज शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी २१कोटी १४लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर मतदारसंघातील विविध गावांना व निरनिराळ्या ठिकाणी जोडणारे अनेक रस्ते सुधारित व पक्के करण्यासाठी २६ कोटी ८४लाख इतका निधी मंजूर झाला आहे, अशीही माहिती आ. अवताडे यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!