अत्यावश्यक सेवा दुकाने 7 ते 11 वेळेसाठी खुली

जिल्ह्यात लॉक डाऊन चे नियम शिथिल

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यात 15 जूनपर्यंत लॉक डाऊन राहणार असले तरीही 1 जून ते 15 जून या काळात दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी दिली जाण्याची आहे. रात्री उशीरा जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश जारी केला असून आज पासून 15 जूनपर्यंत नवे नियम लागू असतील.

मागील काळात सर्वांच्या सामुहिक प्रयत्नामुळे करोनाची दुसरी लाट बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. नागरिक, पोलिस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे. त्यामुळे आता जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने नवे आदेश काढले आहेत. 22 जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता स्थानिक पातळीवर लॉक डाऊन बाबत नियमावली निश्चित करण्यात येत आहे. परंतु असं असलं तरीही अजूनही करोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे आता नव्या सूचनांचंही काटोकरपणे पालन केलं जावं, यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे.

या सेवा सुरू होणार ?

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुकवार या कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत सर्व अत्यावश्यक सेवा दुकाने सुरू राहणार आहेत असेही सांगितले जाते. कृषी पूरक व्यवसाय आणि कृषी संबंधीत सेवा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. शहरातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहतील. निर्धारित वेळेत हॉटेल्स, बार यांना फक्त पार्सल सेवेची परवानगी दिली आहे.

काय बंद राहणार?

दुपारी नंतर ३ अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई घालण्यात आली आहे. हॉटेल,जिम पुन्हा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. रेस्टॉरंट आणि बार फक्त पार्सल/ घरपोच सेवेसाठी सुरू राहतील असेही सांगितले जाते. मॉल्स, केश कर्तनालये बंदच राहणार आहेत.

दरम्यान, या आदेशांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियम मोडल्यास 500 ते 5 हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाणार आहे. मागील 15 दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती, त्यामुळे सर्ग बाजूने मेटाकुटीला आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!