मागील २४ तासात ५७ हजार नवीन बाधित रुग्ण
टीम : ईगल आय मीडिया
देशातील कोरोना बाधितांची दररोज चढत्या क्रमाने वाढत असून पुढच्या काही तासांत हि संख्या १७ लाखांवर पोहोचणार आहे. आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासात देशात तब्बल ५७ हजार ११७ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.
देशात गेल्या चोवीस तासांत ५७,११७ नवे रुग्ण आढळले, तर ७६४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील करोना रुग्णसंख्या १६ लाख ९५ हजार ९८८ वर पोहोचली असून एकूण ३६,५११ रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
गेल्या चोवीस तासांमध्ये ३६ हजार ५६९ रुग्ण बरे झाले असून करोनामुक्त रुग्णांचा आकडा १० लाख ९४ हजार ३७४ वर पोहोचला आहे.
दरम्यान , महाराष्ट्रात २४ तासात ९,६०१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ३२२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १५,३१६ झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १,०५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील बळींची संख्या ६,३९५ झाली आहे. मुंबई २०,७४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.