पुण्याला ‘ रेड अलर्ट ‘ मुसळधार पावसाचा अंदाज
पुणे : ईगल आय मीडिया
राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टी चे असतील, पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केला आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात ही सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेध शाळेने व्यक्त केला आहे.
गेल्या 8 दिवसांपासून पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असून त्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी वाढली आहे. राज्यातील सर्वात मोठे उजनी धरण 40 टक्के भरण्याच्या आवाक्यात आले आहे. तर कोयना धरणाचे दरवाजे उघडून शनिवारी पाणी सोडण्यात आले. नीरा खोऱ्यातही सर्व धरणे 90 टक्केच्या जवळपास भरली आहेत. त्यामुळे वीर धरणातून शनिवारी सायंकाळी 40 हजार क्यूसेक्स चा विसर्ग सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आजपासून पुढील 5 दिवस 19 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार ते मध्यम स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेध शाळेने व्यक्त केला आहे. पुणे शहर आणि घाट भागात अति दक्षतेचा इशारा दिलेला आहे. 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान जोरदार ते मध्यम स्वरूपात पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ही पुढील 5 दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.