पंढरपूरच्या 99 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

वाखरी येथील कोविड केअर सेंटर मधुन 19 रुग्णांना घरी सोडले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

वाखरी येथील कोविड केअर सेंटरमधून गुरुवारी 19 कोरोना बाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे 99 वर्षे वयमान असलेल्या आजोबांनी कोरोनावर विजय मिळवत आज येथून मोठ्या उत्साहाने निरोप घेतला.


वाखरी येथील mit कोविड केअर सेंटर कोरोना बाधित रुग्णांना मोठे लाभदायक ठरत आहे. येथील उत्कृष्ट वैद्यकीय सेवेमुळे रुग्ण लवकर बरे होऊन कोरोनावर विजय मिळवत आहेत. आजवर या ccc मधूनच सर्वाधिक बरे झालेले रुग्ण घरी गेले आहेत.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, आज गुरुवारी आणखी १९ रुग्णांना covid केअर सेंटर मधून सोडण्यात आले. त्यामध्ये शहरातील एक ९९ वर्षाचे गृहस्थ यांचाही समावेश असून उपचारानंतर बरे झाल्याने त्यांनाही आज घरी सोडण्यात आले. या केंद्रातून आजवर एकूण २११ रुग्णांना सोडण्यात आले असून अद्यापही तालुक्यातील 292 active रुग्णवर उपचार सुरू आहेत.
आज उपचार घेऊन घरी परतणाऱ्या नागरिकांनी येथे मिळालेल्या वैद्यकीय सुविधेबाबत अतिशय समाधान व्यक्त केले.

99 वर्षांचे आजोबा आणि 2 वर्षांची चिमुकली 4 पिढ्यांचे अंतर मात्र कोरोनावर मिळून केली मात, काय म्हणतात आजोबा पहा vdo

आणि channel subscribe करा

Leave a Reply

error: Content is protected !!