इच्छुकांची धाकधूक वाढली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत आज ( दि.22 रोजी ) पुन्हा नव्याने काढण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या जे आरक्षण निघाले आहे, त्या प्रवर्गातील सदस्यांची आपले आरक्षण राहते की जाते या चिंतेने धाकधूक वाढली आहे.
91 गावांसाठी आज पुन्हा आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेली सांस्कृतिक भवन येथे सकाळी 11 वाजता ही सोडत2काढली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर 2020 -25 या कालावधीसाठी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण 27 जानेवारी रोजी काढले होते,मात्र हरकती घेण्यात आल्याने अनु जमाती आणि अनु जमाती महिला ही आरक्षणे वगळता उर्वरित 91 ग्रामपंचायतीचे आरक्षण पुन्हा काढण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.