चारही धरणांत गत वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी
टीम : ईगल आय मिडीया
सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील सुमारे दीड लाख हेकटर शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या नीरा नदीच्या खोऱ्यात यंदा प्रथमच पावसाने दडी मारली आहे. अनेक दशकानंतर हि परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाच्या सरासरी प्रमाणात ५० टक्के पर्यंत घट झाली आहे. त्यामुळे नीरेच्या खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर या चार हि धरणांत गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणी साठा झाल्याचे दिसत आहे. अतिवृष्टीच्या या खोऱ्यात ऑगस्ट मध्ये पाऊस पडेल आणि सरासरी गाठेल असे मानले जात आहे. तरीही यंदा पावसाने या खोऱ्यात मारलेली दडी आश्चर्य चकित करणारी आहे. पाऊस घटल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 17 टी एम सी पाणी साठा कमी आहे.
गतवर्षी नीरा खोऱ्यातील धरणांतून एकूण पाणी साठा 53 टी एम सी होता, तुलनेत यंदा हा पाणी साठा 36 टी एम सी इतका आहे.
शनिवार दि २५ जुलै अखेर नीरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या चारही धरणांवर झालेला पाऊस खालील प्रमाणे आहे.
गुंजवणी ६६६ मिमी, नीरा देवघर ५४१ मिमी,
भाटघर २३२ मिमी, वीर २३९ मिमी,
नाझरे १९७ मिमी इतका पाऊस झाला आहे.
तर मागील वर्षी २५ जुलै पर्यंत
गुंजवणी १२२४ मिमी, नीरा देवघर १०८२ मिमी,
भाटघर ४०५ मिमी, वीर २१० मिमी,
नाझरे ३९७ मिमी इतका पाऊस झाला होता.
नीरेच्या खोऱ्यातील धरणातील पाणी साठा
शनिवार दि २५ जुलै अखेर नीरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या चारही धरणांतील पाणीसाठा खालील प्रमाणे आहे.
गुंजवणी ५१. ७१ टक्के, नीरा देवघर २४. १२ टक्के
भाटघर ३८. ३६ टक्के , वीर ३८. ८८ टक्के
नाझरे १६. ४४ टक्के इतका पाणी साठा झाला आहे.
तर मागील वर्षी २५ जुलै पर्यंत ची स्थिती खालील प्रमाणे होती
गुंजवणी ५७. ६० टक्के, नीरा देवघर ५०.५० टक्के
भाटघर ४९. ८६ टक्के , वीर ६३. ३५ टक्के
नाझरे ० टक्के इतका पाणी साठा झाला होता.