निरेच्या खोऱ्यातील पाणी साठा वधारला


तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 tmc ची तूट

टीम : ईगल आय मीडिया

नीरा नदीच्या खोऱ्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संततधार सुरू असून खोऱ्यातील 4 ही धरणातील पाणी साठा वधारला आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या साठ्यामध्ये अजूनही 17 टीएमसी म्हणजेच 35 टक्केची तूट आहे. पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे ही तूट भरून निघण्याची अपेक्षा आहे.
शुक्रवारी सकाळी 6 वाजता नीरा देवघर धरणाची पाणी पातळी 48.67 टक्के होती. गुरुवारी 24 तासात धरणावर 63 मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला आहे. तर भाटघर धरणाचा साठा 60.66 टक्के एवढा असून गुरू7 धरण क्षेत्रात 17 मिमी एवढा पाऊस झाला आहे.वीर धरणाचा पाणी साठा 74.88 टक्केवर गेला असून धरणावर गुरुवारी केवळ 3 मिमी एवढाच पाऊस झाला आहे. निरेच्या खोऱ्यातील गुंजवणी धरणात 76.53 टक्के पाणी साठा झाला असून गुरुवारी धरणावर 85 मिमी एवढा पाऊस झाला आहे.
नीरा खोऱ्यातील 4 ही धरणांत एकूण 61 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. 29.83 tmc एवढा पाणी साठा असला तरी गतवर्षी याच तारखेला नीरा खोऱ्यात 46.88 tmc म्हणजेच 96.19 टक्के इतका पाणी साठा झाला होता.
त्या तुलनेत नीरा खोऱ्यात अजूनही पावसाचे प्रमाण तुटीचे असून सध्या दमदार पाऊस कोसळत असल्याने आठवड्यात ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!