वीर,भाटघर,नीरा देवघरमध्ये 11.21 tmc पाणी शिल्लक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या वर्षी निरेच्या खोऱ्यात पाणी बाणी ची परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निरेच्या खोऱ्यात तब्बल 11.21 टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा निरेच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली होती, मात्र यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले आहे. त्यामुळे सध्या वीर धरणातून निरेच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.मागील वर्षी परतीच्या पावसाने चांगलाच तळ ठोकला होता त्यामुळे पाण्याची मागणी रब्बीच्या हंगामात घटली होती. त्यामुळे उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी निरेच्या खोऱ्यातील वीर,भाटघर,नीरा देवघर धरणात पाणी शिल्लक आहे.
21 जून रोजी सकाळी निरेच्या खोऱ्यातील पाणीसाठा स्थितीनीरा – देवघर धरण
1.947 टी. एम. सी. (16.60% )
भाटघर धरण 6.250 टी. एम. सी. ( 26.59% ) वीर धरण 2.110 टी. एम. सी. (22.42 % ) तर गुंजवणी धरण 0.970 टी. एम. सी. ( 24. 57 %) एवढे पाणी शिल्लक आहे.
दरम्यान, वीरमधून डाव्या कालव्यातून 675 क्यूसेक्स तर उजव्या कालव्यातून 852 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. निरेच्या खोऱ्यात एकूण
11.214 टी. एम. सी. एवढा पाणी साठा असून 23.20% एवढा साठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच तारखेला नीरा खोऱ्यात केवळ 1.839 टी. एम. सी. म्हणजेच 3.18% पाणी साठा होता.