निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं निधन

टीम : ईगल आय मीडिया

हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात मध्यप्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले आहे. महामंडलेश्वर कपिल देव हे करोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.


हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले. हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले होते. मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह केसस केवळ हरिद्वार कुंभ मेळा परिसरातून समोर आल्या आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. करोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दिलेला इशारा धुडकावून बुधवारी हजारो साधूंनी हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान केले. सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करून दुसऱ्या शाहीस्नानालाही साधूंसह अन्य भाविकांनी गर्दी केली होती.

कुंभमेळा परिसरात कुठेही मास्कची सक्ती करताना आढळून आलं नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केलं जात नसल्याचं दिसलं. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचं दिसून आलं.

Leave a Reply

error: Content is protected !!