no corridor ; वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींचा विरोध

विरोधात सोमवारी मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा ईशारा

प्रतिनिधी : eagle eye news
  राज्य सरकारच्या प्रस्तावित कॉरिडॉर ला वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी विरोध  केला आहे. यासंदर्भात शनिवारी  संत कबीर महाराज मठ या ठिकाणी वारकरी संप्रदायातील काही फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती,संस्थानिक यांची बैठक संपन्न झाली. य बैठकीत  महाराष्ट्र शासनाच्या द्वारे सादर केलेल्या पंढरपुर विकास आराखड्यातील प्रस्तावित  ‘काॅरीडाॅर ‘ प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

      यावेळी बोलताना वारकरी संप्रदायाचा कुठेही विकासाला विरोध नाही.मात्र पंढरपुर चा विकास आराखडा राबवत असताना वारकरी संप्रदायाला विचारात घेणे आवश्यक होते.मात्र तसे झालेले नाही.त्यामुळे वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊनच आराखडा तयार केला पाहिजे अशी मागणी यावेळी हभप नामदास महाराज यांनी केली.

वारकऱ्यांना विश्वासात न घेता कॉरिडॉर आणला आहे, विकास कामाला आमचा विरोध नाही. मात्र  कॉरिडॉर ची अमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत व्हायला नको. डीपी प्लॅन ला आमचा विरोध नाही, मात्र कॉरिडॉर नको यासाठी सोमवारी आम्ही मंदिराभोवती प्रदक्षिणा घालणार आहोत., असे संजय महाराज देहूकर म्हणाले.


पंढरपूर तिर्थक्षेत्र बचाव समिती सोबत मिळून वारकरी दृष्टीने नवा विकास  आराखडा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समोर सादर लवकरच सादर करु. तोपर्यंत चालू काॅरीडाॅर प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला दिंडी काढून शासनास  काॅरीडाॅरला प्रखर विरोधाचे निवेदन सादर करण्याचा निर्णय यावेळी झाला.  श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, वारकरी संप्रदाय पाईक संघ, विश्व वारकरी संघ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी संजय देहुकर महाराज,राणा वासकर महाराज, नामदास महाराज, कबीर महाराज, ठाकूर महाराज, उखळीकर महाराज, चवरे महाराज, गुरव महाराज, हंडे महाराज, नंधानकर महाराज, पैठणकर महाराज.तसेच अनेक फडकरी ,मठाधिपती ,दिंडीप्रमुख,
संस्थानिक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!