दूधाचा प्रश्न तापला ; स्वाभिमानी चे दूध बंद आंदोलन

पंढरपूर : ईगल आय मिडीया

दूध दराचा प्रश्न चांगला तापल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी यासंदर्भात खाजगी तसेच सहकारी दूध संस्थांना संघटनेच्या वतीने दूध संकलन बंद ठेवण्याबाबत चे आवाहन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान मिळावे तसेच दूध भुकटी, बटर व तूप यावरील जीएसटी रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी दूध बंद आंदोलन आंदोलनाची हाक दिली आहे. कोरोना महामार्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर दुधाचे दर हे ३२ रुपयांवरून १९ ते २० रुपयांवर आले आहेत. याचा फटका दुग्ध व्यवसायिकांना सहन करावा लागत आहे. एका बाजूला पशुखाद्य तसेच चाऱ्याच्या किमती वाढलेल्या असताना दुधाचे दर मात्र तब्बल बारा रुपयांनी कमी झाले आहेत. ग्रामीण भागात दुग्धव्यवसायाचा नागरिकांना मोठा आधार आहे. अनेकांना बेरोजगार व्हावे लागले असताना दुग्ध व्यवसाय ह आधार ठरत आहे. त्यातच दूध दरातील घसरणीमुळे या व्यवसायाचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे दुधाला शासनाने पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. मंगळवारी शेतकऱ्याने दूध संकलन केंद्रावर दूध न देता ते घरीच ठेवून त्यापासून उपपदार्थ बनवावेत असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!