ओबीसी 4 गावांचे आरक्षण बदलले

तावशी, तुंगत वगळले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये 12 महिला, 13 पुरुष obc आरक्षण होते. करकम्ब, पिराची कुरोली, उपरी नारायण चिंचोली अशी गावे obc प्रवर्गासाठी राखीव झाली आहेत.

येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सांस्कृतिक भवनात आज तालुक्यातील 91 गावच्या सरपंच आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदी उपस्थित आहेत.

याशिवाय नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जैनवाडी, आजोती, पांढरेवाडी, लोणारवाडी, शिरगाव, खरातवाडी, जाधववाडी, तनाळी, केसकरवाडी, खेडभोसे, शंकरगाव नळी, आढिव, नारायण चिंचोली, चिंचोळी भोसे, करकम्ब, नेमतवाडी, पिराची कुरोली, होळे, नांदोरे, पुळूजवाडी, बोहाळी, कोरटी, उपरी, गारडी, ईश्वर वठार ही 25 गावे राखीव झाली आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!