ओबीसी आरक्षण : राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

इंपीरिकल डाटा मागितला !

टीम : ईगल आय मीडिया

ओबीसी समाजाची सखोल माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. केंद्राने जर ही माहिती राज्य सरकारला दिली तर राज्य मागासवर्ग आयोगाला त्या माहितीचे योग्य पद्धतीने विश्लेषण करता येऊ शकेल. आणि आयोग आरक्षणाबाबत योग्य प्रकारे शिफारस करु शकेल याच कारणासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ओबीसा आरक्षणाच्या मु्द्यावर आता राज्य सरकार सक्रिय झाले असून कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारकडून ओबीसी समाजाचा इंपिरिकल डेटा मिळवायचा या प्रयत्नात ते आहे. ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल तर ओबीसींचा इंपिरिकल डेटा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी आता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या डेटासाठी सरकारने सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ही माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्य सरकारला हवा असलेला ओबीसीचा इंपिरिकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही तर टोलवाटोलवी केली. ओबीसींचा इंपिरिकल डेटा मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि ग्राविकास खात्याचे तत्कालीन प्रधान सचिवांनी सन २०१९ मध्ये केंद्र सरकारबरोबर पत्र व्यवहार देखील केले. मात्र केंद्र सरकारने हा डेटा न देता नेहमीच टोलवाटोलवी केली आणि परिणामी ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असेही भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!