गावातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 16 झाली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कौठाळी ( ता.पंढरपूर ) या गावात एकाच कुटुंबातील 12 लोक पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे. त्याच कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या इतर घरातील अन्य 2 जण गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत तर यापूर्वी गावात 1 जण पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे गावातील एकूण रुग्णसंख्या1 6 झाली आहे.
कौठाळी या गावातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर ला पाठवण्यात आले आहे. तर बुधवारी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 11 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. या कुटुंबात एकूण 27 सदस्य आहेत आणि त्यापैकी 12 पॉझिटिव्ह आले आहेत तर 15 जण निगेटिव्ह आले आहेत. मात्र एकाच घरातील 12 लोक पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रामस्थांतून खळबळ उडाली आहे.
गुरुवारी त्या कुटुंबाच्या शेजारील इतर कुटुंबातील लोकांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यापैकी 2 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच मागील महिन्यात गावात एक व्यक्ती पॉझिटिव्ह आलेला होता. असे गावात एकूण 16 लोक पॉझिटिव्ह झालेले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांवर mit कोविड सेंटर येथे उपचार केले जात आहेत आणि ज्याला अगोदर कोरोनाची लागण झाली त्या व्यक्तीला सोलापूर येथे उपचारासाठी नेले आहे.