शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा
टीम : ईगल आय मिडीया
कांद्याला किमती या २५ ते ३० रुपये दर मिळात असताना केंद्र सरकारने अचानक पणे कांदा निर्यातबंदी जाहीर केली. केंद्राने जाहीर केलेल्या या निर्णयाबद्दल कांदा उत्पादकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी संघटनांनी शासनाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सोमवारी केंद्र शासनाच्या व्यापार व उद्योग विभाग अंतर्गत अधिनियम १९९२ सेक्शन ३ अंतर्गत अध्यादेश काढला. यामुळे तात्काळ निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीसह देशभरात कांद्याचे दर हे वाढत असल्याने कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, केंद्राच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे. नाशिक येथील बाजारपेठेत या निर्णयानंतर कांद्याचे दर प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी कमी झाले.
सरकारच्या या निर्णय विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.