ओंकार जोशी मित्र मंडळाचा उपक्रम !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील ओंकार जोशी मित्र मंडळ आणि डॉ. श्रीराज काणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्ट कोंविड क्लिनिक सुरू करण्यात आले. या क्लिनिकचे उद्घघाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयातील ॲड . सारंग सतीश आराध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कोरोनानंतरच्या आजारामध्ये रूग्णाना मोफत उपचार मिळावे यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. घोंगडे गल्ली येथील ओंकार जोशी यांच्या संपर्क कार्यालयात हे पोस्ट कोविड क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल जोशी यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले आहे.
कोरोनाचा दुसऱ्याला लाटेनंतर मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित होऊन गेल्यानंतरच्या आजाराचे प्रमाण रुग्णांमध्ये वाढले आहे. हीच बाब लक्षात घेऊन ओंकार जोशी यांनी डॉ. श्रीराज काणे यांच्या मदतीने मोफत पोस्ट कोविड़ क्लिनिक सुरू करण्याचा ठरवले. संबंधित क्लिनिक हे मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोन वेळा सुरू असणार आहे. यामध्ये घोंगडे गल्ली येथे मंगळवारी तर
शुक्रवारी पद्मावती जवळील डॉ. काणे यांच्या रुग्णालयात सुरू असेल. विशेष म्हणजे या क्लिनिकमध्ये वैद्यकीय सल्ला आणि उपचार हे मोफत असणार आहेत. पहिल्याच दिवशी अनेक रुग्णानी या पोस्ट कोविड रुग्णालयाचा लाभ घेतला.
याप्रसंगी डॉ. श्री. अनिल जोशी, डॉ. श्रीराज काणे, माजी नगराध्यक्ष पांडूरंग घंटी , नगरसेवक अनिल अभंगराव , ऋषिकेश उत्पात , श्रीकांत हरिदास , राजाभाऊ उराडे, पिनू परचंडे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार श्री. परिचारक आणि ॲड . आराध्ये यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कोरोनाबाधित झाल्यावर
अनेक रूग्णाना काही शारीरिक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. अशा रुग्णांनी कुठलीही शारीरिक अडचण घरगुती उपायावर न सोडवता वैद्यकीय सल्ल्यानेच दूर करावी. यासाठीच पोस्ट कोविड क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ गरजू रूग्णांनी घ्यावा आणि आपले आरोग्य सुस्थितीत ठेवावे असे आवाहन डॉक्टर श्रीराज काणे आणि ओंकार जोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.