पंढरपूर : ईगल आय मीडिया
मागील आठ दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह केसेसमुळे हैराण झालेल्या पंढरपुरकरांना रविवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी प्राप्त झालेल्या पाच पैकी चार अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये गुरसाळे येथील तीन व ईसबावी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहर व तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 161 इतकी झालेली आहे.
पंढरपूर शहर तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोनाचे अहवाल मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यात कोरोनाची दहशत पसरली आहे. आठ दिवसातच कोरूना पॉझिटिव पुढची संख्या एकशे पन्नास पेक्षा जास्त झाली आहे. त्या तुलनेत रविवारी दिलासादायक बातमी आलेली आहे. रविवारी पाच लोकांचे अहवाल आले असून त्यापैकी एक निगेटिव्ह व चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरसाळे येथील 1 पुरुष व 2 महिला आणि इसबावी येथील एक पुरुष पॉझिटिव्ह आहेत.
सध्या वाखरी येथील एम आय टी कोवीड सेंटरमध्ये एकूण 120 रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर आजवर 39 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. पंढरपूर शहरातील 93 व ग्रामीण भागातील 26 अन्य तालुक्यातील एक असे 120 रुग्ण यावर उपचार सुरू आहेत. आजवर एकूण 161 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली.