सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलची मागणी
सोलापूर : ईगल आय मीडिया
ऑगस्ट महिन्यांत सर्वच धर्माचे महत्वाचे सण येत आहेत, त्यामुळे मागील 4 महिन्यापासून बंद असलेली सर्व धार्मिक स्थळे मर्यादित स्वरूपात खुली करावीत अशी मागणी सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष फारूक मटके यांनी केली आहे.
23 मार्च 2020 संपूर्ण महाराष्ट्रभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून ते आजतागायत सर्व जातीधर्माचे धार्मिक स्थळे उदा. मंदीर, मस्जिद, गिरजाघर, चर्च इत्यादी धार्मिक स्थळे प्रार्थनेसाठी बंद करण्यात आलेली आहेत.
शासनाच्या आवाहानास प्रतिसाद देवून मुस्लिम समाजाने रमजान ईद सुध्दा साधेपणाने व घरी नमाज अदा करून साजरी करण्यात आलेली आहे.
गेल्या 4 महिन्यापासून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. ऑगस्ट महिन्यात सर्व धर्माचे अनेक सण उदा. श्रावण, रक्षाबंधन, जन्माष्ठमी, गणेश चतूर्थी, बकरी ईद, महोरम, पारसी नव वर्ष असे बरेच सण येणार आहेत.
शासनाच्या कोरोना आजाराला प्रतिबंधित उपाय म्हणून सोशल डिसटंस व मास्क वापरण्याच्या अटींवर सर्व धार्मिक स्थळे उघडणे बाबत आदेश पारीत करणे बाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई-मेल द्वारे करून मागणी करण्यात आले आहे.
सोलापूरचेे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना समक्ष भेटून राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष फारूकभाई मटके यांनी निवेदन दिले. या प्रसंगी मोहोळचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, ओबीसीचे प्रदेश सरचिटणीस लातीफभाई तांबोळी, जिल्हा सरचिटणीस बाबू पटेल, अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष गफूरभाई शेख, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सरफराज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.