ऑक्सिजन अभावी 25 रुग्णांनी जीव सोडला

दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटल मधील घटना

टीम : ईगल आय मीडिया

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात गेल्या २४ तासांत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांनी प्राण सोडलाय. तर गंभीर अवस्थेत असलेल्या ६० रुग्णांचा जीव धोक्यात आहे. रुग्णालयात अवघ्या दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा तातडीचा संदेश रुग्णालयाकडून प्रशासनाला पाठवण्यात आलाय.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस आटोक्याबाहेर जाणारी परिस्थिती भयानक होताना दिसतेय. दिल्लीत सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 25 रुग्णांनी जीव सोडला आहे.

रुग्णालयाच्या मेडिकल डिपार्टमेंटच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पुढच्या दोन तासांत उरलेला ऑक्सिजनही संपुष्टात येईल. व्हेन्टिलेटर आणि बायलेव्हल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर योग्य पद्धतीनं काम करत नाही. रुग्णालयात आयसीयू आणि ईडीमध्ये मॅन्युअल पद्धतीनं व्हेन्टिलेशन सुरू असल्याचंही रुग्णालयानं म्हटलंय.

गंगाराम रुग्णालय हे दिल्लीमधील खासगी रुग्णालयांमध असून ६७५ बेड्सचं एक नामांकित रुग्णालय आहे. याच रुग्णालयात मार्च महिन्यात 34 डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तिथे आता ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत असून २५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

त्वरीत पुरवठा होण्यासाठी हवाई मार्गानं ऑक्सिजन पोहचवण्याची आवश्यकता आहे. आणखीन ६० रुग्णांचा जीव धोक्यात आहे. वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही तर हे रुग्णांनाही वाचवण्यात यश येणार नाही, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीय.

Leave a Reply

error: Content is protected !!