पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता

सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

टीम : ईगल आय मीडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९८ देशांचे राजदूत २७ नोव्हेंबर रोजी भेट देण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाची बैठक झाली आहे.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

देशात कोरोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. पुण्यातील सिरम इन्सिट्यूटकडे सध्या सर्वांचं लक्ष असून अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लसीचे १० कोटी डोस तयार असतील असं सांगितलं आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

सिरम इन्सिट्यूटचे अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविडशिल्ड करोना लसीचे १० कोटी डोस तयार असतील अशी माहिती एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे. तसंच फेब्रुवारीपर्यंत ही संख्या १०० कोटींच्या पुढे असेल असंही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!