पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी मतदान सुरू

पंढरपूर तालुक्यात 8151 मतदार : 20 मतदान केंद्र

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील 20 मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आमहे.     तालुक्यातील 8 हजार 151 मतदारांच्या मतदानाकरिता  20 मतदान केंद्रावर 299  मतदान अधिकारी व कर्मचारी नियुक्त असल्याची माहिती  प्रांताधिकारी ढोले यांनी दिली आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली  आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी  मंगळवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8.00 ते 5.00 यावेळेत मतदान सुरू झाले आहे.  तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही आघाडीवर निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. आ.भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर प्रचार थंडावला असला तरी मतदार मोजकेच असल्याने किती मतदान होते याकडे लक्ष लागले आहे.

पंढरपूर येथून पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस येथील चार तालुक्यातील  नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले असून, या चार तालुक्यातील एकणू 72 मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यात आले. चार तालुक्यातील  शिक्षक मतदारसंघासाठी 28 तर पदवीधर मतदासंघासाठी 44 मतदान  केंद्रावर साहित्य वाटप करण्यात आले आहे, असेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

या निवडणुकीसाठी तालुक्यात 8 हजार 151 मतदार असून,  तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील मतदान केंद्रावर 299 निवडणुक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.  प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षितेसाठी पोलीस कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा वीज पुरवठा, शौचालय,  अपंगासाठी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मतदारासांठी असणाऱ्या रांगेत ठराविक अंतरावर मतदारांना उभे राहता यावे यासाठी  तीन स्वतंत्र्य रांगा करण्यात आल्या आहेत. तसेच मतदारामध्ये समाजिक अंतर रहावे यासाठी चिन्हांकित वर्तुळे करण्यात आली आहेत. मतदारांना आखुन दिलेल्या रांगेतच उभे राहता येणार आहे. मतदारांनी मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत पसंती क्रम अंकात लिहावा. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड-19 च्या आजारबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करुन  आपली जबाबदारी पार पाडावी.  तसेच मतदारांनी आपल्या अमुल्य मताचा हक्क बजावावा असे आवाहनही श्री.ढोले यांनी यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!