पैलवान मारुती सुरवसे याचा धक्कादायक मृत्यू

कोल्हापूर येथे कुस्ती चा सराव करीत असताना हृदयविकाराचा धक्क्याने मृत्यू

पंढरपूर : ईगल आय न्यूज

वाखरी येथील युवा मल्ल मारुती हरिदास सुरवसे वय 23 वर्षे याचा कोल्हापूर येथील तालमीत कुस्तीचा सराव केल्यानंतर सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

लहानपणापासून कुस्तीची आवड असलेला मारुती सुरवसे हा सध्या कोल्हापुरातीलतालमीत कुस्तीचा सराव करत आहे. सोमवारी सायंकाळी तालमीत कुस्तीचा सराव केल्यानंतर त्याने अंघोळ केली, त्यावेळी अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला सहकारी पैलवनांनी रूग्णालयात दाखल केले. रात्री उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

मयत मारूतीचे वडील हरिदास हे वाखरीत शेती करतात. मारुतीच्या तालमीचे आणि कुस्तीचे प्रेम पाहून मारूतीच्या वडीलानी त्याला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ही कुस्तीचे प्रशिक्षण दिले. अशा होतकरु पैलवानाच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!