पालखी महामार्ग मोबदल्यासाठी जनहित याचिका दाखल करणार

मोहोळ शिवसेना नेते नागेश वनकळसे यांचा इशारा

मोहोळ : ईगल आय मीडिया
मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी महामार्गासाठी मोहोळ शहर व तालुक्यातील संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे प्रशासनाने अद्याप पर्यंत फेर मुल्यांकन केले नाही. कवडीमोल मोबदला देऊन प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या संसारावर नांगर फिरवत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दाद मागणार असल्याची माहिती मोहोळचे शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी महामार्ग क्र. ९६५ हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मोहोळ तालुक्याच्या भौगोलिक वैभवात भर पडणार असल्याने जनता आनंदित आहे. मात्र प्रशासनाने संपादित जमिनीचा मोबदला अत्यंत तुटपुंजा आहे. विशेष बाब म्हणजे मोबदला मिळण्या अगोदरच महामार्ग प्रशासनाने ठेकेदारा मार्फत काम देखील सुरु केले आहे. संपादित जमिनीचे मुल्यांकन रेडी रिकनर प्रमाणे होणे गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही.
त्यामुळे येत्या आठ दिवसात जनतेच्या हितासाठी मुंबई उच्च न्यायालयात संबंधीत प्रशासन व सरकारच्या विरोधात जनहित याचिका (public intrest litigation) दाखल करणार असल्या नागेश वनकळसे यांनी सांगितले आहे.


या महामार्गात संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला समृद्धी महामार्गा प्रमाणे मिळाला पाहिजे अन्यथा या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रसंगी धर्मा पाटील व्हायला देखील मागे पुढे पाहणार नाही.
नागेश वनकळसे
शिवसेना नेते मोहोळ.

Leave a Reply

error: Content is protected !!