तर उपसभापतीपदी राजू गावडे यांची बिनविरोध निवड


photo 1) सभापती हरीष गायकवाड 2) उपसभापती राजू गावडे
पंढरपूर : eagle eye news
पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी हरीष भास्कर गायकवाड तर उपसभापतीपदी राजू गावडे ( रा. पुळूज ) यांची बिनविरोध निवड झाली. पंढरपूर बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी करीता सहायक निबंधक डॉ. वैशाली साळवे यांच्या अध्यक्षते खाली गुरुवार ( दि. १८ रोजी ) पंढरपूर बाजार समितीचे सभागृहात नवनियुक्त संचालकांची विशेष सभा पार पडली.
यावेळी सभापतीपदी हरीष गायकवाड व उपसभापतीपदी राजू गावडे यांचे एकेक अर्ज दाखल झाले होते. बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी साळवे यांनी जाहिर केले. निवडीनंतर नूतन सभापती हरीष गायकवाड व उपसभापती राजू गावडे व डॉ. वैशाली साळवे आणि सर्व नूतन संचालकांचा सत्कार माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नुतन सभापती हरीष गायकवाड व उपसभापती राजू गावडे यांनी प्रशांत परिचारक यांनी आमचेवर टाकलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडु व बाजार समितीचा नांव लौकिक वाढवू अशी ग्वाही दिली. यावेळी माजी सभापती दिलीप घाडगे, माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी युवानेते प्रणव परिचारक, बाजार समितीचे माजी सभापती पोपट रेडे, माजी उपसभापती विवेक कचरे, संतोष घोडके, पंचायत समितीचे माजी सभापती वामन माने, पांडुरंग चे संचालक तानाजी वाघमोडे, भैरू वाघमारे, माजी जि प सदस्य सुभाषराव माने , बाळासाहेब देशमुख, अरूण घोलप, माणिक बनसोडे, प्रशांत देशमुख, बाळासाहेब शेख, हरीभाउ गावंघरे, बाळासो थोपटे, चंद्रकांत फाटे, बाजार समितीचे नूतन संचालक दिलीप चव्हाण, तानाजी पवार, हरिभाउ फुगारे,महादेव बागल, संतोष भिंगारे,सौ. शारदा नागटिळक, सौ. संजीवनी पवार,नागनाथ मोहिते,आबाजी शिंदे, महादेव लवटे, अभिजीत कवडे, पंडीत शेम्बडे, शिवदास ताड, वसंत चंदनशिवे,यासिन बागवान,सोमनाथ डोंबे, आबाजी शिंदे आदी उपस्थित होते.