पंढरपूर : सोमवारी कोरोनाचे अर्धशतक

शहरात केवळ 4, ग्रामीणला 46 पॉझिटिव्ह रुग्ण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोनाने सोमवारी पंढरपूर तालुक्यातील मैदानात अर्धशतक ठोकले असून ग्रामीण भागाच्या गोलंदाजीवर 46 धावा चोपून काढल्या आहेत. पंढरपूरकरांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे शहरवासीयांच्या बॉलिंगवर कोरोनास केवळ 4 धावा काढता आल्या आहेत. एकूणच पंढरपूर च्या मैदानात कोरोनाचा आजवर चा स्कोअर 1800 च्या जवळ पोहोचला आहे.

पंढरपूर शहर, तालुक्यातील जनता आणि प्रशासनाच्या कोरोनासोबत सुरू असलेल्या “सामन्यात” सध्या तरी कोरोनाची आघाडी असून तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा स्कोअर 1792 एवढा झाला आहे.
दरम्यान कोरोनाने तालुक्यात तब्बल 28 विकेट्स घेतल्या आहेत.


सोमवारी तालुक्यातील कोरोनाचा स्कोअर 50 झाला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात 46 तर शहरात 4 रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागात जळोली येथे सर्वाधिक 9 रुग्ण सापडले आहेत. करोळे गावात 8, नेमतवाडी 1, करकम्ब 1, उंबरे – पागे 5, पळशी 1, भंडीशेगाव 2, सुस्ते 2, वाडीकुरोली 2, कासेगाव 1, मुंढेवाडी 2, उपरी 1, आढीव 2, चिंचोली – भोसे 4, चळे 1, लक्ष्मी टाकळी 2 असे रुग्ण सापडले आहेत. तर पंढरपूर शहरात 4 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
रविवारी घेण्यात आलेल्या 50 रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये शहरात 4, कौठाळी 2 आढीव 2 असे 8 पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे तालुक्यातील एकून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1800च्या वेशीवर येऊन उभा आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!