मंदिरात जाण्याचा अट्टाहास न करता घेतले कळस दर्शन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
29 जून ते 2 जुलै दरम्यान पंढरपूर शहरात संचारबंदी संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
दरम्यान,ब
कोरोनाच्या लढाईत यश दे आणि कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर असं साकडंही आज देशमुख यांनी पंढरीच्या श्री विठ्ठलास घातले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून श्री विठ्ठल मंदिर 5 जुलै पर्यत विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आल्याने गृहमंत्र्यांनी मंदिरात दर्शनाला जाण्याचा अट्टाहास न करता संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेतले.
आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री आज पंढरपूर मध्ये आले होते.
वारीच्या नियोजनाविषयी माहिती देताना ते म्हणाले, 1 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आहे. या सोहळ्यात मानाच्या नऊ पालखी सोहळ्यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मानाच्या पालख्यातील काही भाविक वगळता कोणालाही पंढरपूर मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पासेस दिल्याचे समोर येत आहे पण हे पासेस रद्द केले असून कोणीही भाविकांनी पंढरपूरला येण्याचा आग्रह धरु नये.
कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन देशमुख यांनी केले.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी वारी दरम्यान संचारबंदीचा प्रस्ताव दिलेला आहे जिल्हाधिकारी त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री मामा भरणे, आ.भारत भालके आदी उपस्थित होते.