पंढरपूर तालुक्यात 199 मिमी पाऊस

पुळूज वगळता सर्व मंडलात दमदार हजेरी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शनिवार दि. 18 जुलै या दिवशी पंढरपुर तालुक्यात दमदार पावसाचे आगमन झाले असून तालुक्यातील सर्व मंडलात 199 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी 22 मी मी पऊस झाला आहे.

मागील 15 दिवसापासून तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शुक्रवारी काही भागात पुनरागम केलेल्या पावसाने शनिवारी दुपारनंतर मात्र तालुक्यातील सर्वच मंडलात मध्यम ते जोरदार स्वरुपात हजेरी लावली. पुलूज मंडल वगळता तालुक्यातील सर्व मंडलात दमदार पाऊस झाला आहे. शनिवार दि 17 तर रविवार पहाटे पर्यंतचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.

तालुक्यातील करकंब मंडलात 3 मिमी, पट कुरोली मंडल 24 मिमी, भंडीशेगाव मंडल 27 मिमी, भाळवणी मंडल 37 मिमी, कासेगाव 22 मिमी, पंढरपूर 31.2 मिमी, तुंगत 30 मिमी, चळे 25 मिमी, पुळुज मंडळात मात्र 0 पाऊस झालेला नाही. या मंडलात 0 मिमी या प्रमाणात पाऊस झाला आहे. शनिवारी सर्व मंडळात मिळून एकूण पाऊस 199.2मिमी झाला आहे. तर संपूर्ण तालुक्यात सरासरी पाऊस 22.13 मि.मी.इतका पाऊस नोंदवला गेला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत उजनी धरणात कमी पाणीसाठा आहे, तसेच तालुक्यातही जुलै मध्ये पावसाने ओढ दिलेली होती, या पार्श्वभूमीवर शनिवारी पावसाचे पुनरागम झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!