पंढरीत सांगोला चौकात अपघात : 1 जण गंभीर जखमी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील सांगोला चौकात भक्ती मार्गावर भेळ च्या गाडीला टिपर ने धकड दिल्याने झालेल्या अपघातात भेळ विक्रेत्याचा मृत्यू झालाय तर आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे.
गुरुवारी सांयकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. सदरचा टिपर हा पंतप्रधान आवास योजनेतील कामावर वाहतूक करीत होता असे समजते.
भक्ती मार्गाला म्हसोबा मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या भेळ च्या गाडीला टिपरने धडक दिली. टिपर अतिशय वेगात होता आणि भेळच्या गाड्याला धडक देऊन सुमारे 100 फूट लांब टिपर ने दुसऱ्या भिंतीला धडक दिली. भेळ विक्रेता अशोक दत्तोबा भागानगरे ( वय 55 वर्षे ) यांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. तर मनोज बापू वाघमारे ( वय 18 रा. पंढरपूर ) हा जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करन्यात आले आहे.