अपघातग्रस्त एकमेकांचे नातेवाईक : 11 जखमींना सोलापूरला हलवण्यात आले

पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर – सांगोला मार्गावर झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 5 झाली असून जखमींची संख्या 11 आहे. सर्वच अपघातग्रस्त बेळगाव जिल्ह्यातील आहेत, तसेच सर्व मयत आणि जखमी नातेवाईक आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूर ला हलवण्यात आले आहे.

पंढरपूर – सांगोला मार्गावर शुक्रवारी सकाळी 6 वाजता कासेगाव हद्दीत 7 मैल येथे रस्त्यावर उभ्या ट्रक ( G j – 3, w -9355 ) ला समोरून बेळगाव ( कर्नाटक ) येथून आलेली बोलेरो जीप ( क्रमांक K A – 04 , M B – 9476 ) ने जोरदार धडक दिली. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. तर 12 जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयात आणले असता आणखी एकजण मयत झाला आहे, त्यामुळे या अपघातातील मयतांची संख्या 5 झाली आहे. तर जखमी 11 लोकांना सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.
या जीपमध्ये एकूण 16 लोक प्रवास करीत होते. या अपघातातील सर्व मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.1) सखाराम धोंडिबा लांबोर ( वय 50, ) 2) शांताबाई लक्ष्मण लांबोर ( वय 62 ), 3) पिंकी उर्फ सुनीता ज्ञानू लांबोर ( वय 11 वर्षे ), 4) नगुबाई काळू लांबोर ( वय 65 वर्षे , सर्वजण राहणार धनगरवाडी, धामणे, जिल्हा बेळगाव, कर्नाटक ) आणि 5) तुकाराम खंडू कदम ( वय 50 वर्षे, रा.बादराई कडवळे, ता.चंदगड, जिल्हा. कोल्हापूर ) अशी आहेत.
तर धोंडिबा बापू लांबोर, कोंडदेव बापू लांबोर, कोमल बापू लांबोर, बबन लांबोर, भारती बापू लांबोर, रोहित यशवंत कांबळे, बापू कल्लाप्पा लांबोर, कोंडीबा विठ्ठल लांबोर, बाबूलाल लांबोर,नगुबाई ज्ञानू कोकरे आणि धोंडिबा सखाराम डोईफोडे अशी जखमींची नावे आहेत. या सर्व जखमींना सोलापूर ला हलवण्यात आले आहे.