संचारबंदी चा फार्स फसला ?

पाच ही तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येतील वाढ कायम

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर च्या व्यापाऱ्यांचा आणि सामान्य नागरिकांचा विरोध असूनही रंगवण्यात आलेला 10 दिवसांच्या संचारबंदी चा फार्स फसल्याचे सिद्ध झाले आहे. आजच्या अहवालानुसार पंढरपुर तालुक्यात तब्बल 152 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.

पंढरपूर सह माळशिरस, सांगोला, माढा या तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. उलट आजच्या अहवालानुसार तर पंढरपुर तालुक्यात 150 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा अहवाल आलेला आहे. त्यामुळे संचारबंदी ही कोरोना साथीला आळा घालण्यास पुरेशी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पंढरपूर सह जिल्ह्यातील 5 तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्याच्या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी 5 तालुक्यात 10 दिवसांची संचारबंदी लावली होती. ती संपली असली तरी कोरोना रुग्ण संख्या घटल्याचे दिसत नाही.

आजच्या अहवालात पंढरपूर शहरात 24 तर ग्रामीण भागात 128 असे 152 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अशीच संख्या माळशिरस तालुक्यात 92, सांगोला 58, माढा 48 तर करमाळा 36 एवढी आहे. त्यामुळे निर्बंध लादून कोरोना कमी होत नाही असेच दिसून येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!