पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची आढावा बैठक

मार्च महिन्यात होऊ शकते घोषणा, एप्रिलमध्ये मतदान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आढावा बैठक आज प्रांताधिकारी कार्यालयात संपन्न झाली. उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदी उपस्थित होते.

आम.भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर रोजी निधन झाले, त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोलीस प्रशासनाने यापूर्वीच बूथ संख्या, पोलीस बंदोबस्त या संदर्भातील अहवाल सादर केलेला आहे. तर निवडणूक विभागाने evm सेटिंग करून घेतली आहेत.

मार्च च्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक जाहीर होऊन एप्रिलमध्ये मतदान आणि निकाल जाहीर होऊ शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

आता नव्याने उदभवलेल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर निवडणूकी बाबत आढावा बैठक आज संपन्न होत आहे. कोरोनाचे नियम आणि निवडणूक, मतदान केंद्र, त्यांची संख्या, सोशल डिस्टनसिंग लक्षात घेता एका बुथवर किती मतदार असावेत आदी विषयांवर या बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply

error: Content is protected !!