शेतीपंपाची वीज तोडणी बंद करा अन्यथा उग्र आंदोलन करू
पंढरपूर : eagle eye news
शेतकऱ्यांची तोडलेली वीज कनेक्शन तात्काळ जोडा , उतरवलेले डीपी चढवा, पाणीपुरवठ्याला वीज मिळू द्या, न सांगता वसुलीच्या नावाखाली शेतीपंप बंद करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. असा इशारा महावितरणला भाजपाचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिला आहे.
पंढरपूर तालुका भाजप आणि पांडुरंग परिवार यांच्या वतीने शेती पंपाच्या वीज तोडणी विरोधात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या नेत्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेती पंपाची वीज तोडणी तात्काळ थांबवा. डीपी परत चढवा. पाणीपुरवठा कनेक्शन होऊ द्या. आटा चक्की सुरू होऊ द्या. नागरिकांना व शेतकऱ्यांना सुखकर जीवन जगू द्या. अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सरकारचे शेती पंपाची विज बंद करण्याचे कोणतेही आदेश नसताना पंढरपूर विजवितरण कंपनीच्या अधिकारी मनमानी करत शेतकर्ऱ्याचा विद्युत पुरवठा बंद केलेला आहे. यामुळे सर्व शेतकर्ऱ्याची पिके धोक्यात येत आहेत व जनावरांचा पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. सद्या खंडीत केलेला विद्युत पुरवठा पुर्ववत करावा व टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांकडून विज बिल भरून घ्यावे. यापुढे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकाराचा अन्याय होवू नये यासाठी हे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, पांडूरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, संचालक तानाजी वाघमोडे, लक्ष्मण धनवडे, बाळासाहेब यलमार, संतोष घोडके, सुनिल भोसले, सुजाता वग्रे, डॉ.प्राजक्ता बेनारे, स्मिता पाटील, कल्पना शिंगटे, संदिप माने, लक्ष्मण वंजारी, सुभाष मस्के, माऊली हलनवर, हर्षल कदम, रणजित जाधव, आबा पवार, नितीन कुसुमडे, संदिप कल्सुळे, राहूल शिंदे यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपाचे व पांडुरंग परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.