पंढरपूर मध्ये भाजपला भगदाड

परिचारक, मोहिते – पाटील आणि भाजप समर्थक राष्ट्रवादी च्या गळाला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक दिवस पंढरपूर दौऱ्यावर आले आणि भाजपला भगदाडे पाडून गेले आहेत. परिचारक, मोहिते पाटील समर्थकांसह भाजपचे आजी – माजी पदाधिकारी राष्ट्रवादीच्या प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यात भाजप उमेदवार समाधान अवताडे आणखी बॅक फुटवर गेले आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक आता ऐन हातघाईला आली आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथे तळ ठोकून भाजपला जोरदार धक्के दिले.

गुरुवारी सकाळी भाजपचे नेते कल्याणराव काळे यांना राष्ट्रवादी मध्ये प्रवेश दिल्यानंतर सायंकाळी परिचारक समर्थक नागेश भोसले, नगराध्यक्षा सौ साधना भोसले, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

तर शुक्रवारी सकाळी मोहिते पाटील – समर्थक संतोष नेहतराव, नगरसेवक सुरेश नेहतराव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या. या सर्व नेत्यांच्या राष्ट्रवादीसोबत जवळीक झाल्यामुळे पंढरपूर शहरात भाजपला भगदाड पडले आहे.

याशिवाय आणखी ही काही नगरसेवक येत्या दोन दिवसांत भाजपला जय श्रीराम करून राष्ट्रवादी चे काम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील भाजपला मोठे खिंडार पडले असून तालुक्यात समाधान अवताडे बॅक फुटवर गेल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!