पंढरपूर पोटनिवडणुक मतमोजणीत पारदर्शकता नाही

स्वाभिमानी संघटनेसह राष्टवादीच्या पदाधिका-यांचा आक्षेप

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील मतमोजणी वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला असून मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आणि फेरमतमोजणी करावी अशी मागणी केली आहे.

१७ एप्रिल रोजी मतदान होवून २ मे रोजी मतमोजणी झाली. यानंतर ४ मे रोजी शेतकरी संघटनेचे रणजित बागल, राष्टवादीचे श्रीकांत शिंदे यांनी मतमोजणीवर शंका घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले. माञ याची दखल न घेतल्याने १६ मे रोजी पञकार परिषद घेतली. यावेळी शैला गोडसे, सचिन पाटील, तानाजी बागल, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, अॅड घुले, रणजित बागल आदी उपस्थित होते.

आ. भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवली. यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. माञ मतमोजणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष उमेदवार शैला गोडसे, सिध्देश्वर आवताडे, राष्टवादी पक्षाच्या पदाधिका-यांनी आक्षेप घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.


स्वेरी काॅलेजमध्ये भाजपच्या प्रमुखांचा मुक्काम होता. आर एस एसचे शिबीर या काॅलेजमध्ये होतात असे असताना या काॅलेजचे स्वाॅफ्टवेअर निवडणुक कामासाठी घेतले. यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती का याचा खुलासा करावा अशी मागणी राष्टवादीचे श्रीकांत शिंदे यांनी केली.

मतमोजणीत आम्हाला पडलेली मते पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आम्ही विजयी होणार नव्हतो पण आम्हाला पडणारी हक्काची मतं कुठे गेली असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रमुख दोन उमेदवारांना २ लाख १३ हजारापैक्षा जास्त मते मिळाली आहेत. अन उर्वरीत सर्व १७ उमेदवारांना १२ हजार मते मिळाली आहेत. मतमोजणीनंतर अनेक नागरिकांचे फोन येत आहेत. आम्ही तुम्हाला मतदान दिले आहे माञ मतमोजणीत हे मते दिसत नाहीत.


मला ३२ लाख ६८ हजार लोकवर्गणी निवडणुकीसाठी लोकांनी दिलेली असताना केवळ १ हजार २७ मते पडली हे मनाला न पटणारी गोष्ट आहे. बुथवाईज मतदानामध्ये मला पडलेली मते दिसत नाहीत. भविष्यातील विरोधकांना आत्ताच संपवण्याचा डाव शांत डोक्याने केलेले प्री प्लॅनिंग असल्याचा खळबळजनक आरोप सचिन पाटील यांनी यावेळी केला.


या निवडणुकीची फेरमतमोजणी करावी. व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्या मोजावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली. माञ या मागणीची प्रशासनाने दखल घेतली नाही. यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. स्वेरी काॅलेजचे संस्थापक हे भाजपच्या एका सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत असे असताना त्या काॅलेजचे साॅफ्टवेअर का घेतले. राज्यातील इतर काॅलेजचे साॅफ्टवेअर घेता येत असताना याच काॅलेजचे का घेतले. याची चौकशी होवून फेरमतमोजणी करावी याचा खर्च करण्यास आम्ही तयार असल्याचे राष्टवादीचे संदीप मांडवे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!