पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर विधानसभा पोटनिवडूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर 12 उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी 1 अर्ज दाखल झाला होता आणि 22 इच्छुकांनी 24 अर्ज नेले आहेत. यावरून निवडणुकीत उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 23 मार्च पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी यामध्ये संतोष महादेव माने (अपक्ष) यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. तर आज दुसऱ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सचिन अरुण शिंदे तसेच संजय नागनाथ माने यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
तर आज माणिक भुई, सिद्धाराम काकणकी, जगन्नाथ डोके,बिरप्पा मोटे, नागेश पवार, सुदर्शन खंदारे ( 2 अर्ज ) सतीश विठ्ठल जगताप, पोपट हरी धुमाळ, मनोज गोविंदराव पुजारी, किशोर सीताराम जाधव, इलियास युसूफ शेख या 12 जणांनी 13 उमेदवारी अर्ज घेतले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.