पोट निवडणुक : दुपारी 1 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजलेपासून मतदान सुरू झाले आहे. 524 मतदान केंद्रावर दुपारी 1 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 3 लाख 40 हजार 889 मतांपैकी 1 लाख 12 हजार 893 मतदारांनी मतदान केले आहे.

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर सकाळी 9 वाजता सरासरी 6. 42 टक्के , सकाळी 11 वाजेपर्यंत 19. टक्के झाले होते. तर दुपारी 1 वाजेपर्यंत शांततेत 33.12 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत 45. 53 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

पंढरपूर विधानसभा पोट निवडून चुरशीची होत आहे. एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत तर मुख्य लढत भाजप चे समाधान आवताडे व राष्ट्रवादी चे भगीरथ भालके यांच्यांत होत आहे. एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. यापैकी सकळी 9 वाजेपर्यंत पहिल्या 2 तासात 21हजार 888 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

पोटनिवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रे आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत 62 हजार 274 पुरुष तर 50 हजार 619 महिलांनी मतदान केले आहे. तर दुपारी 3 वाजेपर्यंत 82 हजार 931 पुरुष तर 72 हजार 271 महिला असे एकूण 1 लाख 55 हजार 202 मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदानासाठी चुरस पाहायला मिळत असून शहरात मात्र संथगतीने मतदान सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!