कार्तिकीचा जनावरांचा बाजार रद्द

पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि जनावरांनाही आलेला लप्पी रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्तिकी यात्रेनिमित्त येथे भरवला जाणारा बाजार रद्द करण्यात आलेला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त दरवर्षी जनावरांचा बाजार भरवला जातो. शेकडो वर्षांपासून भरवला जाणारा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार मानला जातो. मात्र यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आणि जनावरांवर आलेला लप्पी रोग लक्षात घेता यंदा बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने ही 30 नोव्हेंबर अखेरीस लॉककडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. लप्पी रोगाचा प्रादुर्भाव हवेतून, संपर्कातून होऊ शकतो हे पाहता जनावरांचा बाजार यंदा रद्द करण्यात आल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून वाखरी येथील पालखी तळावर जनावरांचा बाजार स्थलांतरीत झाला असून यंदा वाखरी तळावर आषाढी यात्रेपाठोपाठ जनावरांचा बाजार ही रद्द झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!