बुधवारी आले 260 पॉझिटिव्ह अहवाल
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या कमी होत नसून दररोज रुग्ण संख्या वाढतच आहे. बुधवारी सायंकाळी 8 वाजेपर्यंत मिळालेल्या एकून अहवालानुसार शहर व तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 1475 एवढी झाली आहे. तर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या अहवालात 135 लोक पॉझिटिव्ह आले आहेत तर पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात केलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये 125 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बुधवारी एकूण 260 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि एकूण रुग्ण 1475 एवढे झाले आहेत. आणि 26 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पंढरपूर शहरात कोरोनाची संख्या वाढत असून याला आवर घालण्यासाठी प्रशासनाने शहरात 7 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. गुरुवार संचारबंदी चा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या पाहता संचार बंदी वाढते की उठवली जाते याकडे लक्ष लागले आहे.
बुधवारी आलेल्या अहवालानुसार शहरात गणेश नगर, गांधी रोड, इसबावी, कडबे गल्ली, महावीर नगर, माळी वस्ती, नामदेव मंदिराजवळ, iti कोलेज जवळ, रुक्मिणी नगर, तुळशी नगर, यासह ग्रामीण भागातील भांडीशेगाव, वाखरी, तुंगत,कासेगाव,खेडभोसे, ओझेवाडी, रोपळे,कासेगाव, करकंब, खेडभाळवणी आदि गावात हे रुग्ण आढळले आहेत.