पंढरपूर मध्ये भाजपची पदयात्रा उत्साहात संपन्न

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ शहरात विविध भागात पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

प्रारंभी संत नामदेव महाद्वार येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी मंदीर परिसर, जुनी पेठ, प्रदक्षिणा मार्ग, नाथ चौक अशा विविध भागातून ही पदयात्रा पार पडली.

यावेळी आ. प्रशांत परिचारक, मर्चंट बँकेचे अध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह उमेदवार समाधान अवताडे, भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक विक्रम सिरसाट, नगरसेवक प्रताप गंगेकर, नगरसेवक अक्षय गंगेकर , बंडू मामा कदम, नागेशभाऊ जाधव, शंकर पवार, संतोष शेळके, मदन बोंडफळे, गणेशभाऊ पवार, पिंटू दिवेकर, आमृतभाऊ गायकवाड, धनंजय नांदरे, दिपक वाडेकर, गणेश बागल, रविभाऊ राजपूत, संतोष पावना, समाधान पोळ व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!