पंढरीत संचारबंदीस मुदतवाढ

31 पर्यंत लॉक डाऊन कायम राहणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील संचारबंदी आणखी एक।दिवसाने वाढवण्यात आली असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी आदेश काढला आहे. दरम्यान राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेला लॉक डाऊनचा कालावधी आणि नियम 31 ऑगस्ट पर्यंत कायम राहतील असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी करून संपर्क साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या दरम्यान पंढरपूर शहरात संचारबंदी लागू केली होती. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार,लोकांचा सार्वजनिक वावर बंद करन्यात आला होता. आणि या दरम्यान सुमारे 3 हजारांवर रॅपिड अँटीजन टेस्ट करून शहरातील 600 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर संचारबंदी वाढवणार की उठवली जाणार याकडे नागरिकांचे लक्ष होते.
गुरुवारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आदेश काढुन 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 ते 24 वाजेपर्यंत 1 दिवस संचारबंदी कायम राहील असे जाहीर केले आहे. त्यानंतर 30 जुलै रोजीच्या आदेशानुसार 31 ऑगस्टपर्यंत लॉक डाउनचे नियम लागू राहतील असेही या आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!