ग्रामीणच्या तुलनेत रुग्ण संख्या आटोक्यात आली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरीही ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण वाढीचे प्रमाण कमी आहे. ऑगस्ट च्या पहिल्या पंधरवड्यात लागू केलेली संचारबंदी पंढरपूरकराना पावली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. पंढरपूर तालुका जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेला तालुका ठरला आहे. दरम्यान शुक्रवारच्या अहवालानुसार खर्डी येथे सर्वाधिक 6 पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत. या अहवालानुसार ग्रामीण भागात 12 तर शहरात 23 असे 35 रुग्ण आढळले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मागील 6 दिवसांपासून तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट झालेल्या नाहीत. Rtpcr च्या अहवालानुसार तालुक्यातील रुग्ण संख्या जिल्ह्यात सर्वाधिक झालेली आहे.
शहरात प्रशासनाने 8 दिवसांची संचार बंदी लागू केली होती. त्याचा परिणाम शहरात चांगला झाला आहे. कोरोनाची शहरातील संख्या सध्या आटोक्यात आहे, मात्र ग्रामीण भागात हो संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सध्या शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 35 एवढी झाली आहे. त्यामध्ये शहरातील संख्या1243 तर ग्रामीण संख्या 792 एवढी आहे.शहरातील 24 तर ग्रामीण भागातील 13 लोकांचा आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सरासरी पाहिली तर ग्रामीण भागात प्रादुर्भाव आणि मृत्यूचे प्रमाण अधिक वाढताना दिसून येत आहे.
शहराला संचारबंदी उपयुक्त ठरली असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील खर्डी येथे सर्वाधिक 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर भंडीशेगाव, चळे, एकलासपूर, कान्हापुरी, लक्ष्मी टाकळी, शेळवे या गावात नवीन रुग्ण आढळले आहेत.