आज / उद्या जाहीर होण्याची शक्यता
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन लागू केला जावा असा प्रस्ताव पाठवण्यात आला अधिकृत माहितीनुसार 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान लॉक डाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृत आदेश सोमवारी ( 3 ऑगस्ट )रात्री किंवा मंगळवारी ( दि.4 ) रोजी निघण्याची शक्यता आहे. जिवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी विशिष्ट कालावधी वगळता 7 दिवस बाकी संपूर्ण बाजारपेठ व व्यवसाय ठिकाने बंद ठेवण्यात येतील असेही समजते.
पंढरपूर शहरात मागील एक महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. रुग्णांची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने खूप मोठे प्रयत्न केले, तरीही कोरोना संसर्ग नियंत्रित होत नाही. पंढरपूर शहरातील प्रत्येक गल्लीत कोणाचा शिरकाव झाला आहे असून रुग्णसंख्या 500 च्या वर झाली आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रित करण्यासाठी शहरात पूर्णपणे लॉक डाउन करणे हा एक पर्याय तपासून पाहण्याची मागणी होत आहे.
कापड दुकाने, सराफ असो. अशा अनेक संघटनांसह व्यापाऱ्यांनी स्वतःहून काही दिवसांसाठी आपली आस्थापने, आपले व्यवसाय बंद ठेवून लॉक डाऊन केला आहे. नागरिकातून ही कोरोनाच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे 4 ते 10 ऑगस्ट या कालावधीत लॉकडाऊन लावू करावा अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर कालावधी 7 दिवसांचाच ठेवून तारखामध्ये बदल करण्यात आल्याचे समजते. सुधारित तारखा 6 ऑगस्ट 13 ऑगस्ट यादरम्यान असतील असे समजते. सात दिवसांसाठी कडक लॉक डाऊन जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मेडिकल दुकाने, दवाखाने तसेच जीवनावश्यक वस्तूची दुकाने काही विशिष्ट कालावधीपर्यंत सुरू ठेवून बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्याची शिफारस असल्याची समजते. सोमवारी रात्री किंवा मंगळवारी अध्यादेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.