पंढरपूर तालुक्यात नवीन 73 पॉझिटिव्ह


1650 : जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढतच आहे. शनिवारी मिळालेल्या अहवालानुसार शहर व तालुक्यातील 73 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या जिल्ह्यात सर्वाधिक 1650 एवढी झाली आहे. तर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या अहवालात 73. त्यामुळे बार्शी अक्कलकोट ला मागे टाकून पंढरपूर शहर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर गेले आहे.

पंढरपूर शहरात कोरोनाची संख्या वाढत असून याला आवर घालण्यासाठी प्रशासनाने शहरात 8 दिवसांची संचारबंदी लागू केली होती. या दरम्यान मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणी केली आहे.
१५ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार शहरात बडवे गल्ली, उत्पात गल्ली, डाळे गल्ली, भक्ती मार्ग, नवी पेठ, परदेशी नगर, भोसले चौक,जुनी पेठ, एकनाथ नगर, इसबावी, संत पेठ, पोलीस लाईन, कोळी गल्ली, सावरकर चौक, प्रदक्षिणा मार्ग यासह ग्रामीण भागातील सरकोली, गुरसाळे, रोपळे, लक्ष्मी टाकली, सिद्धे वाडी, सुस्ते, तुंगत, आढीव आदि गावात हे रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागात रोपळे 10 तर गुरसाळे येथे सर्वाधिक 9 रुग्ण सापडले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!