पंढरपुरात काँग्रेसला आणखी एक धक्का

शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंत यांना पाठिंबा

पंढरपूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांनी आणखी एक धक्का बसला असून काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी सह काँग्रेसच्या विविध सेल च्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दिलेला आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, उमेदवार अनिल सावंत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, सुधीर भोसले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप मंडवे, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, औदुंबर शिंदे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमर सूर्यवंशी यांनी आम्हाला काँग्रेसचा उमेदवार मान्य नाही, त्यामुळे आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल सावंत यांच्या पाठीशी आहोत.आम्ही खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात नाही, कुणाचा दबाव नाही, आम्हाला अनिल सावंत यांचे नेतृत्व आवडले म्हणून आम्ही अनिल सावंत यांना पाठिंबा देतोय

Leave a Reply

error: Content is protected !!