पंढरपूरमध्ये कोरोना बाधित नवीन 6 रुग्ण वाढले

सक्रिय रुग्णांची संख्या पोहोचली 21 वर

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूरमध्ये आज ( दि. 10 जु. रोजी नवीन ६ positive रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरातील कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या 21 झाली आहे.

शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जुनी पेठ येथे २४ वर्ष वयाचा पुरुष, बसवेश्वर नगर, इसबावी येथे २ पुरुष रुग्ण अनुक्रमे ३५ व १५ वर्ष वयाचे पॉझिटिव्ह आले आहेत. संतपेठ येथील महापूर चाळ शाळा न ९ जवळ २० वर्ष वयाचा पुरुष, जिजाऊ नगर येथे ३५ वर्ष वयाची स्त्री, सांगोला रोड येथील यमाई – तुकाई जवळ ३२ वर्ष पुरुष असे एकूण ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व पूर्वीच्या positive रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती असून त्यांना covid केअर सेंटर ,वाखरी येथे उपचार चालू केले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांनी दिली.
पंढरपूर शहर व तालुक्यात आज पर्यंत एकूण positive रुग्ण ४७ इतके झाले आहेत.
उपचार पूर्ण बरे झालेले १८ रुग्ण तर मयत रुग्ण १ आहे.
सध्या active उपचार चालू २८ त्यापैकी इतर तालुका व जिल्हा पंढरपूर कनेक्शन active ७
पंढरपूर तालुक्यातील active रुग्ण एकूण २१ त्यापैकी १७ शहर ४ ग्रामीण भागातील आहेत असेही डॉ बोधले म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!