पंढरपूर च्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक

गुरुवारी सापडले 71 रुग्ण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या एकदम कमी झाली असली तरीही ग्रामीण भागातील कोरोना चा मुक्काम कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे पंढरपूर शहरात ग्रामीम भागातील नागरिकांची होणारी गर्दी पुन्हा कोरोना वाढीस कारणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची आजच्या अहवालातील संख्या 80 असली तरी त्यापैकी तब्बल 71 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आणि केवळ 9 रुग्ण शहरात आढळुन आलेले आहेत.

गेल्या महिन्यापासून पंढरपूर शहरातील रुग्ण संख्या कमालीची कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात तर शहरात सापडणाऱ्या रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी झालेली आहे.मात्र ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. अजूनही ग्रामीम भागात सापडणारे रुग्ण चिंताजनक प्रमाणात आहेत.

त्यातच आता आषाढी यात्रा जवळ आल्याने ग्रामीण भागात परगावातून येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. तर शहरातील रस्त्यावर आणि बाजारपेठेत ही मोठ्या संख्येने लोक दिसू लागल्याने आज शहरातील नियंत्रित असलेली रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!