संचारबंदीतून दिलासा मिळणार ?

राष्ट्रवादी च्या नेत्यांनी मंत्र्यांकडे घेतली धाव !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील संचारबंदी शिथिल करण्यासंदर्भात आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन शहरातील व्यापाऱ्यांच्या भावना आणि संचारबंदी चुकीची असल्याचे वरिष्ठ मंत्र्यांना सांगितले आहे. त्यावर मंत्र्यांनी ही सकारात्मक भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याची सूचना केली आहे. त्यामुळे संचारबंदी च्या फासातून पंढरपूर कराना दिलासा मिळण्याची शक्यता बळावली आहे. आज या संदर्भात काय निर्णय होतो याकडे शहरातील व्यापारी,नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सध्या पंढरपूर ग्रामीण मध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दि.13 ऑगस्ट पासून पंढरपूर तालुक्यामध्ये संचारबंदी लावण्याची जाहीर केली आहे.
याबाबत

दोन दिवसांपासून भाजपचे आमदार समाधान अवताडे आणि विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी आपल्या पातळीवर प्रयत्न करून पाहिले मात्र यश आले नाही. त्यावर1 दोन्हीही नेत्यांनी सरकार आमचे ऐकत नाही अशी हतबलता व्यक्त केली आहे. त्यानंतर दोन दिवसांपासून व्यापारी वर्गाने शहरात आंदोलन सुरू केले नाही. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मोठ्या नेटाने उतरली आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी संचारबंदी ला विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी च्या नेत्यांनी नेटाने पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांच्या भावना सरकार ला कळवल्या आहेत. 10 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी चे नेते कल्याणराव काळे यांनी पत्र लिहून संचारबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. तर आज 11 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, स्वाभिमानी चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांना संचारबंदी मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. ना.टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी यावर चर्चाही केली.

तर विठ्ठल सहकारी साखर साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आज ( 11 )रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची समक्ष भेट घेऊन पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत सविस्तर चर्चा करून संचारबंदी शिथिल करावी याबाबत लेखी पत्रही दिले.

या संदर्भात बोलताना भगीरथ भालके म्हनालेे की, ज्याप्रमाणे आमदार स्व.भारतनाना हे नेहमीच पंढरपूर वासीयांच्या सोबत राहिले त्यांच्या नंतर मीही कायमच आपल्या सोबत राहिन. त्यामुळे व्यापार्‍यांवर व इतर नागरिकांवर अन्याय होणार नाही.

त्यावर पाटील यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तातडीने फोन करून सूचना दिल्या की, पंढरपूर शहरात संचारबंदीसाठी तीव्र विरोध असेल तर पंढरपूर शहरातील सर्व लहान-मोठे व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक, सर्व पदाधिकारी यांचे समवेत त्वरीत मिटिंग घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून मगच संचारबंदीवर तोडगा काढावा, जेणे करून व्यापारी व नागरिकांवर अन्याय होणार नाही.

एकंदरीत आज पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांना दिलासा देणाऱ्या घटना राजकीय पातळीवर घडल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यासाठी यशस्वी पुढाकार घेतल्याच दिसून येत आहे. उद्या यावर अंतिम निर्णय होऊन संचारबंदी बाबत दिलासादायक आदेश येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!